
पावस येथील अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा
पावस : दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी एसटी चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणिक गंगाधर दहीफळे (वय 38, रा. माळनाका, रत्नागिरी) असे एसटी चालकाचे नाव आहे.
हा अपघात पावस ते गावडे आंबेरे जाणार्या रस्त्यावरील भक्तनिवास येथील वळणावर शुक्रवार 8 जुलै रोजी सकाळी 10 वा.सुमारास घडला होता.
या अपघातात विनित अनिल गोताड (वय 50, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी सकाळी एसटी चालक दहीफळे हा हर्चे-पावस ते रत्नागिरी असा भरधाव वेगाने येत होता. त्याच सुमारास विनित गोताड होंडा शाईन घेऊन पावस ते गावडे आंबेरे असा जात होता. ही दोन्ही वाहने येथील वळणावर आली असता दहीफळेचा एसटीवरील ताबा सुटला आणि त्याने समोरून येणार्या दुचाकीला धडक देत अपघात केला. यात विनित गोताड याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शनिवारी एसटी चालकाविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.