आमदार योगेश कदम यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले स्वागत
दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी शिवसेना -भाजप युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शनिवारी पहिल्यादांच खेड तालुक्यात भेट दिली. यावेळी शिवसेनेसह भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.कशेडी येथून खाली आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह खेडच्या दिशेने निघाले, त्यावेळी उधळे येथील भारतीय जनता पार्टींचे ज्येष्ठ पदाधिकारी राजूभाई रेडीज यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर आ. कदम यांनी खेड शहरातील सोनारआळी येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी भाजपच्या वतीने जिल्हा सरचिटणीस संजय बुटाला, शहर अध्यक्ष अनिकेत कानडे, वैजेश सागवेकर, रोहन राठोड, माधव जोशी, उदय खेडेकर, प्रवीण चव्हाण, मिलिद शिंदे, विकास तांबे, भूषण काणे, खालिद परकार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.