नांदेडच्या विठ्ठल भक्ताने विठ्ठल रुक्मिणीला १ कोटी किमतीचा सोन्याचा मुकुट दिला भेट
विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण देशातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. तब्ब्ल दोन वर्षांनी कोरोनाचे संकट दूर झाले आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेले भक्त बऱ्याच वर्षांनी भक्तांना विठ्ठलावरचं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळालीये. नांदेडच्या एका भक्ताने विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचा मुकुट भेट दिलाय.श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला अडीच किलो वजनाचे एक कोटी रुपयाचे सोन्याचे मुकुट भेट म्हणून देण्यात आलंय. आषाढी एकादशीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील भाविक विजयकुमार उत्तरवार श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला सोन्याचे मुकुट भेट देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रम पार पडेल. विजयकुमार उत्तरवार उमरी येथील सोन्या चांदीचे व्यापारी आहेत.
www.konkantoday.com