
कोल्हापुरातील अत्याचार प्रकरणातील आरोपी घरातला नातेवाईक निघाला
बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या शिये गावामधे दहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती.या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली घटनेची गंभीर दखल होती. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केली. धक्कादायक म्हणजे आरोपी घरातलाच निघाला. जवळच्या नातेवाईकानेच मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याचं उघड झालं आहे. पीडित कुटुंबीय हे मूळचे बिहारचे असून गेल्या तीन वर्षापासून शिरोली मध्ये आपल्या कुटुंबासोबत रहात आहे.शिये गावातील राम नगर परिसरात शिवानी कुमार ही 10 वर्षीय चिमुकली आपल्या कुटुंबासोबत राहत होती. काल संध्याकाळी मृत मुलगी आणि तिची पाच भावंडे घरात होती. यावेळी एक व्यक्तीने शेतामधील नारळ काढायचे त्यामुळे तू माझा सोबत चल असं या चिमुरडीला सांगितलं. त्या बदल्यात पाच रुपये देतो असं आमिष दाखवलं. त्यानंतर ही दहा वर्षीय चिमुकली त्या व्यक्तीसोबत घरा पाठीमागे असणाऱ्या शेताकडे निघून गेली. संध्याकाळी मुलीचे आई वडील कंपनीतून काम करून घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना मुलगी घरात कुठेच दिसली नाही. त्यांनी मुलीचा सगळीकडे शोध घेतला, पण मुलगी कुठेच सापडली नाही. अखेर सकाळी मुलगी बेपत्ताअसल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी डॉग स्कॉडची मदत घेत मुलीचा शोध सुरु केला. त्यानंतर घराच्यामागे असलेल्या उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तात्काळ वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण केलं. मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत परिसरातील सीसीटीव्हीचं फुटेज पाहिलं. नातेवाईकच निघाला नराधमसीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत मुलगी एका तरुणासोबत उसाच्या शेताकडे जाताना दिसली.या आधारे पोलिसांनी मृत मुलीच्या जवळच्या नातेवाईकाला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच या नराधमाने आपला गुन्हा कबुल केला.