पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी नवदाम्पत्याची चक्क पाण्याच्या टँकरवरून रात्री वरात
कोल्हापुरात कशासाठी लोक काय करतील याचा नेम नाही… तसेच घडले. मंगळवार पेठेतील खासबाग परिसरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी प्रिन्स क्लबच्या वतीने नवदाम्पत्याची चक्क पाण्याच्या टँकरवरून रात्री वरातकाढण्यात आली.
या अभिनव आंदोलनाकडे नागरिकही मोठ्या औत्सुक्याने पाहात असल्याचे दिसून आले. खासबागच्या प्रिन्स क्लबचे कार्यकर्ते विशाल कोळेकर आणि अपर्णा साळुंखे हे गुरुवारी विवाहबद्ध झाले, त्यानिमित्ताने त्यांची महाद्वार रोड मिरजकर तिकटी खासबाग परिसरातून हलगी-लेझीम, घुमक्याच्या तालावर वरात काढण्यात आली.
www.konkantoday.com