नाणिज इरमलवाडी येथे रिक्षा उलटून रिक्षा चालकाच्या पत्नीचा मृत्यू
रत्नागिरी : तालुक्यातील नाणिज इरमलवाडी येथे रिक्षा पलटी होऊन २३ वर्षीय विवाहिता व तीन जण जखमी झाल्याची घटना ३१ मे रोजी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास घडली. या अपघातात एकाच्या मृत्यूस व तिघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल भगवान आलदर ( वय ३० पंढरपूर , सोलापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आदलकर हा आपल्या रिक्षातून तीन प्रवासी घेऊन पंढरपूर ते गणपतीपुळे असा देवदर्शनासाठी जात होता. नाणीज येथील वळणावर इरमलवाडी येथे रिक्षा पलटी झाली होऊन पुंडलिक अंकुशराव , पुनम अंकुशराव , रिध्देश आलदार असे तीन प्रवास जखमी झाले. शुभांगी अनिल आलदार ( वय २३ ) ही रिक्षा चालकाची पत्नी असून तिचा या अपघातात मृत्यू झाला. या अपघाताची फिर्याद मोहन कांबळे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार रिक्षा चालक अनिल आलदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.