
माझ्या मेंदूची किंमत महिन्याला २०० कोटी, पैशांची मला कमी नाही : नितीन गडकरी
माझ्या मेंदूची किंमत महिन्याला २०० कोटी आहे. माझ्याकडे पैशांची अजिबात कमतरता नाही आणि मी कधीही खालच्या पातळीवर जाणार नाही,” असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी इथेनॉल धोरणाबद्दलच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर केले.माझ काम आणि प्रयोग पैसे कमावण्यासाठी नसून ते शेतकरी आणि त्यांच्या कल्याणासाठी आहेत, असंही गडकरी म्हणाले.
नागपूरमध्ये ॲग्रिकोस वेल्फेअर सोसायटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं, मी हे पैशांसाठी करतोय? मला प्रामाणिकपणे पैसे कसे कमवायचे हे माहित आहे. मी कुठलाही ‘व्हील-डीलर’ नाही. राजकारण्यांना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी लोकांना एकमेकांविरुद्ध लढवायची कला चांगलीच अवगत आहे. मागासलेपण हेच एक राजकीय साधन बनले आहे, असेही त्यांनी सांगितले.




