
तुम्ही सारखे दादा दादा करता. आता मात्र दादा नाव फक्त राहिलंय, दादागिरीतील हवा कधीच निघून गेली आहे- आमदार भास्कर जाधव
महाविकास आघाडी फुटल्याने मविआतील नेतेही फुटीर गटातील नेत्यांवर आरोप करत आहेत. कोकणातील ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री करून त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. भास्कर जाधव सुरुवातीला अमित शाहांची नक्कल करत म्हणाले, “अमित शाह पवार आणि उद्धव ठाकरेंना विचारतात की तुम्ही राज्यात काय केलं. पण केंद्रातलं आणि राज्याचं सरकार तुम्ही चालवता आणि प्रश्न येऊन तुम्ही उद्धव आणि शरद पवारांना विचारता?” “अरे जर प्रश्नांची उत्तरे देण्याची योग्यता नसेल तर योग्यता नसलेल्या राज्यकर्त्यांना आज दिल्लीच्या किंवा राज्याच्या तख्तावरू खाली ओढलं पाहिजे की नाही? असा थेट सवालही त्यांनी विचारला. पुढे त्यांनी अजित पवारांवरही टीका केली. अजित पवारांवर टीका करत म्हणाले, “अजित पवार पूर्वी फक्त शरद पवारांबरोबर होते तेव्हा दादा कोण म्हणून कोणी विचारला की तेव्हा एका क्षणात अजित पवार असं नाव येत असे. पण आता लोक अजित पवारांना दादा मानायला तयार नाहीत.” पुढे अजित पवारांची नक्कल करत म्हणाले, “काय रे राजेश कुठे आहेस तू. आवाज येतोय की नाही. असं म्हटलं की राजेश भैयाची पॅन्टच हालायची. माझी नाही कधी हलली. तुम्ही सारखे दादा दादा करता. आता मात्र दादा नाव फक्त राहिलंय, दादागिरीतील हवा कधीच निघून गेली आहे”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.www.konkantoday.com




