आमदार भास्कर जाधव रमले भातशेतीत
गुहागर : शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत. जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात. समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये उतरतात.
पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात. एकाच पायावर दोनदा शस्त्रक्रिया झाल्यानंतरही ते पूर्वीसारखेच उत्साहाने शेतीच्या कामात झोकून देताना यावेळी पहावयास मिळाले.