सिंधुदुर्ग विमानतळावरील विमानसेवा राम भरोसे,गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा खराब हवामानामुळे विमान रद्द
सिंधुदुर्ग विमानतळावर सध्याच्या पावसाळी हवामानामुळे विमान लॅन्डिंग करण्यास पायलटला अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा खराब हवामानामुळे विमान रद्द करण्यात आले.सलग तीन दिवस खराब हवामानामुळे विमान रद्द करण्याची वेळ अलायन्स एअर कंपनीवर आली आहे, त्यामुळे या पावसाळी मौसमात सिंधुदुर्ग विमानतळावरील विमानसेवा राम भरोसे असल्याचे बोलले जात आहे.खराब हवामानात विमान सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असणारी अद्यायावत यंत्रणा विमानतळावर बसविण्यात न आल्यामुळे अलायन्स एअर कंपनीला अडचणी निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
www.konkantoday.com