
सुरेंद्र घुडे यांचे रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून 23 एप्रिलला पद्मविभूषण डॉ धनंजय कीर यांच्या चरित्रावर भाषण.
रत्नागिरी : पद्मविभूषण डॉक्टर धनंजय किर यांची 111 वी जयंती दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्ताने समाजभूषण श्री सुरेंद्र घुडे यांचे रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता पद्मविभूषण डॉ धनंजय कीर यांच्या जीवन चरित्राची माहिती देणारे भाषण प्रसारित करण्यात येणार आहे.श्री. घुडे हे शासकीय सेवानिवृत्तीनंतर आजही सामाजिक कार्यात व्यस्त असून त्यांना नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार तसेच राज्यस्तरीय आदर्श साहित्य गौरव पुरस्कार 2025 जाहीर झालेले आहेत.