आमदार शेखर निकम यांच्यामार्फ़त संगमेश्वर आरोग्य विभागास इनव्हरटरची देणगी

आमदार शेखर निकम यांच्याकडून संगमेश्वर तालुक्यातील COVID19 यंत्रणा संदर्भात आढावा घेण्यात आला.
यावेळी कोरोना चाचणी,संबधित रिपोर्ट नियोजन या बाबतीत आरोग्य अधिकारी डॉ.सोनावणे मॅडम आणि आमदार शेखर निकम यांच्यात चर्चा झाली असता,दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे संपूर्ण संगमेश्वर परिसरात वीजपुरवठा पूर्ण पणे खंडित झाला होता त्यामुळे COVID19 च्या टेस्टिंग अहवालाचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते असे डॉ.सोनवणे यांनी आमदार शेखर निकम यांना आढावा चर्चेत सांगितले.
यावेळी आमदार शेखर निकम यांनी आरोग्य विभागास इनव्हरटरची देण्याचे कबूल केले,व तातडीने संगमेश्वर आरोग्य अधिकारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी अनिरुद्ध शेखर निकम निकम,राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस बारक्याशेठ बने,तालुकाध्यक्ष विवेक शेरे,नगरसेवक प्रफुल्ल भुवड,युवक अध्यक्ष पंकज पुसाळकर, व आरोग्य विभातील कर्मचारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button