
माखजन बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी
संगमेश्वर : तालुक्यातील गडनदीला पूर आला असून पुराचे पाणी माखजन बाजारपेठेत घुसले आहे. कालपासून पावसाचा जोर वाढला असून कुचांबे, पाचांबे परिसरात जोरदार पाऊस झाल्याने गडनदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. गडनदीला पूर आल्याने गडनदीलगत असलेल्या बुरंबाड, कोंडीवरे, सरंद, माखजन, धामापूर, आरवली , करजुवे आदी गावात भातशेतीत पुराचे पाणी घुसले आहे. गडनदीशेजारील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.