
नातूनगर घागवाडीकडे जाणार्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प
खेड : तालुक्यातील नातूनगर घागवाडीकडे जाणार्या रस्त्यावर लगतच असलेल्या डोंगरातील मातीचा काहीभाग कोसळल्यामुळे हा मार्ग ठप्प झाला. याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी सौ.मोरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशिद यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने सायंकाळी उशिरापर्यंत त्या ठिकाणची माती बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते. पावसाचा जोर वाढत असल्याने खेड शहरासह ग्रामिण भागात विद्युतपुरवठा खंडीत झाला आहे.