दारुच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात फावडे घातल्याने पत्नी जखमी

दापोली : तालुक्यातील शिरखल, गाववाडी येथे दारुच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात फावडे घातल्याने पत्नी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पत्नी संजीवनी शिंदे (45, शिरखल, गाववाडी) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संजय विष्णू शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा पती नेहमी अति दारु पिऊन कारण नसताना त्रास देतो. 3 जुलै रोजी सायंकाळी 6.60 वा. संजीवनी या जेवण बनवत असताना दारु पिऊन आलेल्या त्यांच्या पतीने हातातील फावडे त्यांच्या डोक्यात मागील बाजूने मारुन दुखापत केली. याबाबतची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पती संजय शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button