कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत मध्य रेल्वेच्या वतीने सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत मध्य रेल्वेच्या वतीने ७४ फेऱ्यांची घोषणा करण्यात आली.त्यानंतर या गाड्यांचे आरक्षणही सुरू करण्यात आले. मात्र, अवघ्या दीड मिनिटांत या जादा गाड्यांचेही आरक्षण फुल्ल झाले असून चाकरमान्यांना आता आणखी जादा गाड्यांची प्रतीक्षा आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही नियमित गाड्यांमध्ये वेटींगची क्षमता संपल्याने सिटींग आणि स्पिलरचे आरक्षणही बंद झाले आहे.
कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात येणार आहेत. रेल्वेतर्फे जादा ७४ फेऱ्यांची घोषणा झाल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला होता; मात्र, गणेशोत्सव कालावधीत या गाड्यांचेही बुकिंग पूर्ण झाले आहे. यंदा ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी उत्सव आहे. त्यासाठी २५ ऑगस्टपासून चाकरमान्यांनी कोकणात दाखल होणार आहेत. मात्र, २५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीतही सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. ‘कोकणकन्या’, ‘मंगलोर’, ‘तुतारी’ एक्सप्रेस या गाड्यांचे सिटींग आणि स्लिपरचे आरक्षणही बंद झाले आहे.
www.konkantoday.com