रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये धुव्वाधार पाऊस, नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ तर काही ठिकाणी माती शिरल्याने नुकसान
संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे. तर कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. पावासाचा जोर असा कायम राहिला तर पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनान केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, चिपळूण, मंडणगड, खेड याभागात जोरदार पाऊस कोसळत आहे. लांजा तालुक्यातील विलवडे येथे मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर आंजणारी वरचा स्टॉप येथे मुंबई-गोवा महामार्गालगत ठेवण्यात आलेला मातीचा भराव पावसामुळे जवळच्या घर, दुकानात शिरून सामानाचे नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून पावसात जोर कायम राहिल्यास शेतीचा देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.
चिपळूणमध्ये गेल्या तीन तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे चिपळूणच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले आहे
मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकच्या कापसाळ सुर्वेवाडी येथील महामार्ग पाण्याखाली गेला आहे. गेल्या तीन तासांपासून चिपळूणमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. अपुऱ्या चौपदरीकरणाचा फटका महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना बसला आहे. महामार्गावरील अपुऱ्या कामामुळे पावसाचे पाणी तुंबले आहे.. या पाण्यातून सध्या जीव मुठीत घेउन प्रवासी प्रवास करत आहेत.
परशुराम घाटालपर्यायी लोटे – कळबस्त्र – चिरणीमार्गावर आज पडलेल्या पावसामुळे दोन मोठ्या गाड्या फसल्याने हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली
www.konkantoday.com