
महामिनिस्टर सौ. लक्ष्मी ढेकणे यांचा जाहीर नागरी सत्कार
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांचे वतीने झी मराठी पुरस्कृत महामिनिस्टर या कार्यक्रमाच्या महाराष्ट्राच्या महाविजेत्या व 11 लाख रुपयांची महापैठणी जिंकणाऱ्या आपल्या रत्नागिरीच्या व रोटरी परिवारातील सौ. लक्ष्मी मंदार ढेकणे यांचा जाहीर नागरी सत्कार व प्रकट मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सौ. लक्ष्मी मंदार ढेकणे यांचा सत्कार , त्यांना शाल श्रीफळ भेटवस्तू व मानपत्र देऊन जिल्हा परिषद सी.ई.ओ. इंदूराणी जाखड यांच्या शुभहस्ते रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊन व सर्व रत्नागिरी करांच्या वतीने करण्यात आला.
सदर सत्काराचे प्रसंगी सौ. लक्ष्मी ढेकणे यांच्या महामिनिस्टर प्रवासातील त्यांच्या सर्व सख्या उपस्थित होत्या.
या सर्व सख्यांना, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मीडटाऊन यांचे वतीने प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
या जाहीर नागरी सत्कार प्रसंगी सौ. लक्ष्मी ढेकणे यांची , महामिनिस्टर या प्रवासासंदर्भातील प्रकट मुलाखत देखील आयोजित करण्यात आली होती. या मुलाखत प्रसंगी मुलाखतकार सौ. दीप्ती कानविंदे यांनी, सौ. लक्ष्मी ढेकणे यांचा, या महामिनिस्टर स्पर्धेसंदर्भातील सौ. लक्ष्मी यांच्या संपूर्ण स्पर्धा प्रवासाचा उलगडा, त्यांचे कडून करून घेतला.
सौ. लक्ष्मी ढेकणे यांनी महाहोममिनिस्टर प्रवासा संदर्भात अगदी दिलखुलास व सविस्तर मुलाखत दिली. तसेच महिलांनी मागे न राहता आत्मविश्वासाने पुढे येणे आवश्यक आहे, असा संदेश देखील समस्त महिला वर्गांस दिला.
जिल्हा परिषद सी.ई.ओ. मा. इंदुराणी जाखड यांनी , महिला सक्षमीकरण तसेच महिलांचा समाजपयोगी कामांमध्ये सहभाग व त्यातून समाजपयोगी प्रबोधन व उपक्रम चांगल्या प्रकारे कसे होतील या संदर्भात उत्तम मार्गदर्शन केले तसेच सौ. लक्ष्मी यांचे कौतुकही केले.
सदर सत्काराचे प्रसंगी सौ.लक्ष्मी मंदार ढेकणे यांनी, अकरा लाखाची महापैठणी समस्त रत्नागिरीकरांना पाहण्याकरिता उपलब्ध केली होती.
या नागरी सत्कार कार्यक्रमासाठी बहुसंख्य रत्नागिरीकर, विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य , रोटरी परिवारातील सदस्य व पदाधिकारी, सौ. लक्ष्मी यांच्या स्पर्धेदरम्यानच्या सर्व सख्याब तसेच सौ. लक्ष्मी ढेकणे यांचे कुटुंबीय, हितचिंतक, मित्रपरिवार आवर्जून उपस्थित होते.
www.konkantoday.com