
महिलेला मारहाण करून बलात्कार केल्याच्या आरोपावरून एकाला अटक
खेड तालुक्यातील कुडोशी येथे एका चाळीस वर्षीय महिलेला बेदम मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी रवींद्र पवार या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.फिर्यादी महिला ही कुडोशी या गावी आपल्या सासू व मुलीसह राहते यातील आरोपी पवार याने फिर्यादीला घरी येऊन प्रेमाबाबत विचारले त्या वेळी तिने नकार दिला या राग येऊन आरोपीने तिला पट्ट्याने मारण्यास सुरुवात केली ते सोडवण्यासाठी आलेल्या सासूलाही आरोपीने ढकलून दिले आरोपींविरुद्ध पोलीस पाटलांकडे तक्रार देण्यासाठी सासू व मुलगी बाहेर गेली असता आरोपीने आपल्या घरात जाऊन कुऱ्हाड आणली व फिर्यादीच्या डोक्यात मारली व तीला आतील खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला सदर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे
www.konkantoday.com