
खेड येथे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली,एनडीआरएफचे वीस जणांचे पथक चिपळूण मध्ये दाखल
खेड येथे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने सायरन वाजविण्यात आला असून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे
राजापूर येथे काजळी नदी देखील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने अलर्ट सायरन वाजविण्यात आला आहे
चिपळूण येथे पाणी पातळीत सकाळपासून वाढ होत आहे वशिष्ठ नदीच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेऊन एनडीआरएफचे एक वीस जणांचे पथक चिपळूण मध्ये दाखल झाले आहे.
जिल्ह्यात पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे
www.konkantoday.com
