पावसाचा फायदा उठवत लवेलमध्ये सोडले नाल्यात सांडपाणी

खेड : दरवर्षीप्रमाणे लोटे येथील रासायनिक कंपन्यांकडून पावसाच्या पाण्याचा फायदा उठविण्याचे काम यंदाही सुरू असून गुरूवारी येथील दोन कंपन्यांकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडल्याचे ग्रामस्थांनी उघडकीस आणले आहेत.
खेड तालुक्यातील ही रासायनिक औद्योगिक वसाहत स्थापनेपासून सातत्याने प्रदुषणाच्या मुद्द्यावर चर्चेत राहिली आहे. जल प्रदुषणामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत निकामी केल्यानंतर नदी, नाले, ओढेही कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे नेस्तनाबूत झाले आहेत. वायू प्रदूषणाने फळबागा शेती यासह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र या कशाचीही तमा न बाळगता आजही बिनदिक्कत प्रदूषण सुरूच आहे.
संपूर्ण रासायनिक स्वरुपाची कारखानदारी येथे कार्यरत असून वसाहतीच्या पश्चिमेस खाडी आहे. पूर्वेकडून येणारे पावसाचे पाणी याच खाडीत येऊन मिसळते. नेमका याचाच फायदा घेत पावसाळ्यात अनेक कंपन्या आपल्या उत्पादनातील सांडपाणी व घनगाळ सामूदायिक सांडपाणी प्रकल्प केंद्रात न सोडता थेट ओढा, पर्‍या, नाले यांना सोडतात. लोटे औद्योगिक वसाहतीत होऊ घातलेल्या फिशरीज कंपनीने उघड्यावर टाकलेला रासायनिक कचरा असगणीतील ग्रामस्थ इस्माईल काद्री यांनी निदर्शनास आणून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button