खेडमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष
खेड : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर खेडमध्ये रात्री उशिरा शिवसेने व भाजप कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोष केला. राज्यात जुळलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या नवीन समिकरणाचे पडसाद आता कोकणात उमटू लागले आहेत. गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शिवसेना शिंदे गटाचे समर्थन खेड-दापोली-मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे संमिश्र पडसाद मतदारसंघात उमटले आहेत. नवीन शिवसेना-भाजप युती सरकार सरकारच्या स्थापनेचे संकेत शपथविधी झाल्यानंतर मिळाल्यानंतर खेडमध्ये गुरुवारी रात्री उशिरा श्री सिद्धिविनायक मंदिर येथे भाजप कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला.