खापणे महाविद्यालयातील डॉ. मेश्राम यांचा चंद्रपूर येथील गोंडवाना विद्यापीठात गौरव
राजापूर : रायपाटण श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांना आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनचा महात्मा फुले इमिनन्ट रिसर्च नॅशनल अवॉर्ड 2022 नुकताच प्राप्त झाला. चंद्रपूर येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू व डॉ. संदेश वाघ यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. ‘दक्षिण कोकणातील धम्मदीक्षीत बौद्धामधील परिवर्तन’ या विषयावर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठातून पीएच.डी. मिळविली आहे. मुंबई विद्यापीठ मुंबई आणि जे. जे. टी. विद्यापीठ राजस्थान या दोन्ही विद्यापीठांची इतिहास विषयाची गाईडशिप त्यांना लाभली आहे. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक पेपर प्रकाशित झाले आहेत. आय. सी.एस. एस. आर.चा 50 हजार रुपयांचा संशोधन प्रकल्प ही ते सध्या करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष मनोहर खापणे, सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.