
मुंबई-गोवा महामार्गावर गाडगीळवाडी डोंगर फाट्यावर ट्रक उलटला
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर गाडगीळवाडी डोंगर फाट्यावर गोव्याकडून मुंबईकडे जाणारा मालवाहू ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रक चालकासह क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटून ट्रक पलटी झाल्याने चालक व वाहक ट्रकमध्ये अडकून पडले होते. मात्र पोलिस, स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईतून गोव्याकडे जात असलेल्या मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी या दोघांनाही ट्रकबाहेर काढून तत्काळ उपचारासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. महंमद गफूर वाईद (वय 23) व मोहमद सिफायत अली (वय 16) दोघेही रा. जम्मू काश्मिर अशी या जखमी चालक आणि क्लीनरची नावे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

