जांभूळगड येथे तरुणाची गोठ्यात गळफासाने आत्महत्या

रत्नागिरी : जांभूळगड येथे तरुणाने अज्ञात कारणातून घराशेजारच्या गोठ्यात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार 25 जुलै रोजी सकाळी 6 वा.सुमारास उघडकीस आली. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश दत्‍ताराम मांडवकर( वय 40, रा.जांभुळगड,रत्नागिरी) असे आत्मत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिस पाटील जयंत गोपाळ फडके यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, रविवार 24 जुलै रोजी रात्री 10 वा. प्रकाशने पत्नी प्राजक्‍ता मांडवकर हिला मी घराशेजारच्या गोठ्यात झोपायला जातो असे सांगितले होते. सोमवारी सकाळी 6 वा.सुमारास प्राजक्‍ता गोठ्यात गेली असता तिला पती प्रकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तिने हंबरडा फोडताच शेजारी राहणारे संजय चंदुरकर यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन याबाबत पोलिस पाटील जयंत फडके यांना माहिती दिली. पूर्णगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. अधिक तपास पोलिस हवालदार महेश कुबडे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button