हातखंबा बोंबलेवाडी येथील काजूचे दुकान फोडून 2 लाखांचे काजूगर लांबवले
रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर हातखंबा बोंबलेवाडी येथील दळवी कॅश्यू नावाचे काजूचे दुकान फोडून अज्ञातांनी 2 लाख 20 हजार 700 रुपयांच्या काजूची पाकिटे चोरून नेली. ही घटना 28 जून ते 29 जून या कालावधीत घडली. गेल्या 4 ते 5 महिन्यात हे दुकान दुसऱ्यांदा फोडण्यात आले आहे. याबाबत संदेश परशुराम दळवी (वय 48, रा.आरोग्यमंदिर, रत्नागिरी ) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा पत्रा काढून दुकानातील वेगवेगळ्या वजनाच्या एकूण 1 हजार 148 किलो काजूची पाकिटे चोरली. याचा अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.