संगमेश्वर तालुक्यात पावसाने नुकसान

देवरूख : संगमेश्वर तालुक्यात मागील तीन दिवस पडत असलेल्या पावसाने एका घराचे छप्पर कोसळून 3 हजार 680 रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात 489 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील कुंडी येथील जयश्री बने यांच्या घरावर दोन दिवसांपूर्वी झाडाची फांदी पडून छप्पर कोसळले. याचा पंचनामा करुन नुकसानीची नोंद देखील करण्यात आली आहे. पावसाने पांगरी, शिवणे, निवधे या ठिकाणी दरड कोसळून रस्ते काही कालावधीसाठी बंद झाले होते. दरड हटवून मार्ग मोकळे झाले आहेत. तालुक्यात 3 जून रोजी पावसाने हजेरी लावली. दि. 26 रोजी 130 मि.मी. बरसला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button