
परशुराम घाटात जीवे ठार मारण्याच्या प्रकारातील आरोपी अद्याप मोकाटच.
खेड तालुक्यातील मेटे मोहल्ला येथे घडलेल्या मुलीच्या वादाप्रकरणी सामंजस्याने सलोखा करण्यासाठी गोवळकोट येथे आलेल्या चार जणांच्या गाडीवर परत जाताना परशुराम घाटात हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून तिघांना जखमी केल्याची घटना शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घडली होती.
या प्रकरणी दहापैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य सात आरोपी मोकाट आहेत. त्यांच्यावर पोलीस का कारवाई करीत नाहीत? एक महिना होवून गेला, तरी जिल्हा युवक कॉंग्रेसचचा अध्यक्ष साजिद सरगुरो व अन्य आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या तपासाबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.www.konkantoday.com