मुंबई-गोवा महामार्गावर कामथे हरेकरवाडी येथे काँक्रीटीकरणाला मोठी भेग; जमीनही खचली
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे हरेकरवाडी येथील जमीन खचली आणि काँक्रीटीकरणाला मोठी भेग पडली आहे. याची पाहणी अधिकाऱ्यांनी केल्यानंतर जुन्या डांबरी रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे. तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे व ठेकेदार कंपनीच्या अधिकार्यांनी याची पाहणी केली. काँक्रिटीकरणाला तडे गेले असून या ठिकाणची माती खचली आहे.