
तांबी-निर्व्हाळ रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग
चिपळूण : तालुक्यातील निर्व्हाळ-रावळगाव-खरवते-तांबी हा रस्ता आता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग होणार आहे. 1.800 कि.मी.च्या या रस्त्याला दर्जोन्नती मंजूर झाली असून जि. प. कडून सा. बां. कडे वर्ग होणार आहे. आ. भास्कर जाधव यांच्या विशेष प्रयत्नाने या रस्त्याला दर्जोन्नती मिळाली आहे. याबाबत शासन निर्णय निघाला आहे. याबद्दल निर्व्हाळ, रावळगाव ग्रामस्थांनी आ. भास्कर जाधव यांचे आभार मानले आहेत. माजी पालकमंत्री व आ. भास्कर जाधव यांच्याकडे या रस्त्याला
दर्जोन्नती मिळावी यासाठी अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता. अखेर याची दखल घेत आ. जाधव यांनी याबाबत प्रस्ताव केला. जि. प. मध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर मंत्रालय स्तरावर दर्जोन्नतीला मंजुरी मिळाली असून या कामासाठी निर्व्हाळचे सुपुत्र जयराम पवार, या रस्त्याचा आराखडा करणारे माजी अभियंता व रावळगावचे सुपुत्र प्रकाश जाधव, सरपंच मधुकर सावंत, दीपक सावंत यांनी या कामासाठी विशेष पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले