
प्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट निर्मातीज्योतिका अन् सुर्यानं घेतलं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन
ज्योतिकात ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आहे. ज्योतिकानं तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. वयाच्या २८ व्या वर्षी तिने अभिनेता सूर्यासोबत लग्न केलं होत आणि आजही दोघांचा सुखााच संसार सुरू आहेसूर्या आणि ज्योतिका या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतंच या लोकप्रिय जोडीनं देवदर्शन केलं आहे.
ज्योतिका आणि सूर्यानं कामाख्या देवी आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला भेट दिली. या भेटीचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं, “नवीन वर्षात कोल्हापूर महालक्ष्मी आणि कामाख्याच्या पवित्र शक्तीपीठांना भेट दिल्यानं आनंद झाला. माझ्या पुढच्या चित्रपटाची सुरुवात… तुमचं प्रेम आणि आशीर्वादांसाठी मी नेहमीच आभारी आहे”. या जोडप्याचे हे कोल्हापूर मंदीरातील फोटो पाहून मराठी चाहत्यांना आनंद झाला आहे.