
राज्यातील सर्वात मोठी विठ्ठलाची उंच मूर्ती सातार्यातील वाईजवळ उभी राहणार
पुण्यातील शिल्पकार विनोद येलापूरकर यांनी तब्बल 35 फूट उंचीची विठ्ठल मूर्ती साकारली आहे.सिंहगड रोड येथील आपल्या स्टुडिओत सुप्रसिद्ध शिल्पकार विनोद येलारपूरकर यांनी राज्यातील सर्वात मोठी आणि चौथऱ्यासह विठ्ठलाची उंच मूर्ती साकारली आहे.विठ्ठलाची भलीमोठी मुर्ती सातारा जिल्ह्यातील वाईजवळील कुडाळ गावातील भालेकर कुटुंबाच्या बंगल्यात आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती विष्णु रुपात साकरली आहे. मुर्तीच्या उजव्या हातात कमल पुष्प आणि डाव्या हातात शंख, अशा विष्णू रुपात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.विठ्ठलाची ही मुर्ती बनविण्याकरिता प्रत्येकी 40 किलो वजनाची तब्बल 200 शाडूच्या मातीची पोती लागली. तर, दीड हजार किलो वजनाचा लोखंडी सांगाडा वापरण्यात आला.
तसेच यात पूर्णपणे फायबर वापरण्यात आले आहे. यामुळे ही मूर्ती हवा, पाणी आणि इतर कोणत्याही वातावरणात खराब होणार नाही. 10 फुटी चौथाऱ्यावर मूर्ती स्थापन केल्यानंतर बाजूला पेटी, तबला, वीणा, डगा ही वारकऱ्यांची वाद्यंही लावण्यात येणार आहे. तसेच 25 फुटांवर ही मुर्ती विठ्ठलाची मुर्ती उभी राहणार आहे.
www.konkantoday.com