
दापोली मुरुड येथे समुद्रकिनारी पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधा मोडकळलेल्या अवस्थेत
कोकणातील समुद्र किनाऱ्याचे पर्यटकांना मोठे आकर्षण आहे त्यामुळे दापोली मुरुड परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात
मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात आलेली आणि कित्येक वर्षे धोकादायक झालेली पर्यटकांसाठी उभारण्यात आलेली चेंजिग रूम जमीनदोस्त झाली आहे. तर अजून स्वच्छतागृह मात्र धोकादायक स्थितीत उभे आहे.पर्यटकांना समुद्राच्या पाण्यातून बाहेर आल्यानंतर कपडे बदलता यावेत, यासाठी मुरूड समुद्रकिनाऱ्यावर चेजिंगरूम तसेच स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली होती; मात्र पहिल्याच पावसात या इमारती खचून धोकादायक झाल्या होत्या. ही परिस्थिती गेली अनेक वर्षे होती. या कामी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता, तो आता वाया गेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com