
राज्यातील ब्रेक द चेन आणि लॉकडाऊन संदर्भात परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल
राज्यातील ब्रेक द चेन आणि लॉकडाऊनसंदर्भातही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
”कोरोना कमी होतोय हे नक्कीच, पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्यावेळी आपण अनुभव घेतलाय. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण, थोडीशी शिथिलता आली अन् कोविड चौपटीने वाढला”, असे म्हणत लॉकडाऊन वाढला जाण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच, सध्याचा विषाणू घातक असून वेगाने पसरत आहे. आपण निर्बंध शिथील करू तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
www.konkantoday.com