आपत्कालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे महावितरणचे आवाहन

रत्नागिरी : पावसाळ्यात वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून पडणे, रोहित्र कोसळणे अशा घटना घडतात. तेव्हा नागरिकांनी वीज यंत्रणेला स्पर्श करणे टाळावे. अशा स्थितीत वीजग्राहकांनी वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. धोकादायक वीजयंत्रणेची सूचना तत्काळ महावितरणच्या कार्यालयास द्यावी. आपातकालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे महावितरणचे आवाहन आहे. जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 7875765019 तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7875765018 हे आहेत. नागरिक व वीजग्राहक या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देऊ शकतात. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन विभाग, उपविभाग स्तरावर समन्वयासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत. निसर्ग, तौक्ते या चक्री वादळांचा तडाखा, कोरोनाचा संकटकाळ अशा आपत्तीप्रंसगी केलेल्या कामाचा अनुभव महावितरण कर्मचाऱ्यांच्या गाठीशी आहे. संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी महावितरणने आवश्यक पूर्वतयारी केली आहे. शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे 1912 वा 1800-102-3435 वा 1800-233-3435 या 24 तास सेवेत असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजपुरवठा खंडितची तक्रार 022-41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नोंदविण्याची सोय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button