सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला शाश्वतजीवनशैलीवर आधारित पर्यटन करणारा जिल्हा म्हणून भविष्यात ओळखला जाणार
सिंधुदुर्ग हा भारतातील पहिला शाश्वत जीवनशैलीवर आधारित पर्यटन करणारा जिल्हा भविष्यात ओळखला जावा, असे प्रतिपादन वन्यजीव अभ्यासक डॉ. योगेश कोळी यांनी येथे संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे आयोजित शाश्वत जीवनशैलीवर आधारित पर्यटन कार्यशाळेत केले.
सिंधुदुर्गातील शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शाश्वत पर्यटनाचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, माय वे जर्नी ऑर्गनायझेशन, कोकणी रानमाणूस इकोटुरिझम आणि महाराष्ट्र टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत दोनशेहून अधिक लोक उपस्थित होते.
कोकणात शाश्वत पर्यटनाचे पहिले मॉडेल राबवणारे ‘रानमाणूस’ प्रसाद गावडे, वन्यजीव अभ्यासक डॉ. योगेश कोळी, वानोशी फॉरेस्ट होम स्टे चालविणारे प्रवीण देसाई, पक्षीनिरीक्षक प्रवीण सातोसकर, स्वयंसेवक पर्यटन राबविणारे पांडुरंग राणे, ‘मांगर फार्म स्टे’चे बाळू दादा, कांदळवन सफारी घेणारे वाडेकर काका, ‘डायरेक्टर ऑफ टूरिझम’चे उपअभियंता प्रशांत राणे आदी मान्यवर व्यक्ती प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. क.म.शि.प्र. मंडळ कुडाळचे सरकार्यवाहक श्री. आनंद वैद्य कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मान्यवरांना डॉ. कोळी लिखित ‘बर्ड लाईफ ऑफ सिंधुदुर्ग’ हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले
www.konkantoday.com