चिपळुणातील गोवळकोट येथे रस्त्यावरील मगरीचा व्हिडीओ व्हायरल
चिपळूण : शहराच्या भागातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचा वावर वाढला आहे. गोवळकोट रोड येथे मगरींची संख्या वाढली आहे. या भागात मगरी रात्रीच्या वेळी रस्त्यावरच मुक्तसंचार करताना दिसत आहेत. सोमवारी रात्री काही नागरिक गोवळकोट रस्त्याने जात असताना त्यांनी रस्त्यावर आलेल्या मगरीचे चित्रीकरण केले. गोवळकोट चर येथे एकाच ठिकाणी मगरींची संख्या अधिक आहे. रहदारी असलेल्या बाजारपूल व शिवनदी पुलानजीक भल्या मोठ्या मगरींचे दर्शन नेहमी होते. आतापर्यंत या मगरींपासून कोणताही धोका पोहोचलेला नाही. परंतु भीतीचे वातावरण आहे.
शहरातील गोवळकोट चर येथे कायम मगरी असतात.
साधारण तीन फुटापासून दहा फूट लांबीच्या मगरी येथे आहेत. रस्त्यावरून येता-जाता येथे मगरी दिसतात. या तलावाभोवती संरक्षक भिंत उभारण्याची मागणी होत आहे.