खेड नगर परिषदेच्या ३५ हजारांच्या ऐवजाची चोरी

खेड : शहरातील एकविरा नगर येथील नगर परिषद दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या नगर परिषदेच्या बायोगॅस संबंधित साहित्याच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप अज्ञाताने तोडून खोलीमधील पाच इलेक्ट्रिक मोटर्स व लोखंडी दोरखंड असा एकूण ३५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना शनिवारी २५ जून रोजी संध्याकाळी ६ ते सोमवारी २७ जून रोजी सकाळी ७.३० वा. च्या मुदतीत घडली आहे. याबाबत अरविंद सावंत (वय ३५, रा. चिंचघर वेताळवाडी, खेड) यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button