मुसळधार पावसात रंगली पालशेतची क्रिकेट स्पर्धा
गुहागर : मुसळधार पाऊस, एका बाजूला पाण्याचा प्रवाह, मैदानातील चिखल अशा माहोलात दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेतची क्रिकेट स्पर्धा रंगली. पावसाळी क्रिकेट स्पर्धेत दापोली इलेव्हन संघ विजेता ठरला तर चिंचेश्वर साखरी आगर संघ उपविजेता ठरला. यावर्षी प्रथमच 51 हजार रूपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. दापोली संघाने चिंचेश्वर संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना चिंचेश्वर संघाने 42 धावा केल्या. या धवांचा दापोली इलेव्हन संघाने उत्कृष्ट फलंदाज निखिल पारवे याच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर सहज पाठलाग केला. उत्तेजनार्थ बक्षीस बाळू इलेव्हन सुरळ आणि गार्गी वरवडे या दोन संघांना देण्यात आले. या स्पर्धेत टेनिस क्रिकेटमधील नामवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विजेत्या संघाला 51 हजार रूपये, उपविजेत्या संघास 25 हजार तर उत्तेजनार्थ 11,111 रूपये, चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच मालिकावीर, उत्कृष्टफलंदाज, गोलंदाज आदी बक्षिसेही देण्यात आली. मालिकावीर दर्शन बांदेकर, सामनावीर निखिल पारवे, उत्कृष्ट फलंदाज निखिल पारवे आणि उत्कृष्ट गोलंदाज सोहेल खान यांना गौरविण्यात आले. समालोचन साईराज दाभोळकर, नीलेश पाटील, सुभाष सावंत, असिफ साल्हे यांनी केले.
खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी, दर्यावर्दी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग दाभोळकर, उपाध्यक्ष गुरुनाथ जाक्कर, सचिव दिनेश जाक्कर, कार्यकारिणी सदस्य नीलेश पाटील, महिला मंडळ अध्यक्षा मेघा पाटील, जलपरी आगडे, विकास दाभोळकर, कविता पटेकर, जतिशा पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विकास दाभोळकर, संजय वासावे, ज्ञानेश्वर पाटील, राजकुमार आगडे, जगदीश पाटील, प्रशांत होडेकर, रामा जाक्कर, गजानन म्हातनाक, प्रतिम वासावे, अरविंद पाटील, सुनील पाटील, समीर पाटील आदींनी परिश्रम घेतले.