
माहेर संस्थेत 74 वर्षांच्या आजीने केले ध्वजारोहण
रत्नागिरी : रत्नागिरीतील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेतील 74 वर्षाच्या आजी कुसुम शिवलकर यांच्या हस्ते तिरंगा फडकावून हा दिन साजरा करण्यात आला. माहेर संस्थेच्या संस्थापिका, संचालिका लुसी कुरियन यांच्या संकल्पनेने ध्वज फडकवण्याचा मान आजीला देण्यात आला. संस्थेचे अधीक्षक, प्रकल्प प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.