
केरळचा मोहम्मद शहाबुद्दिन छोटूर 8640 किलोमीटर पायी प्रवास करुन हाजला निघाला,लांजामध्ये जोरदार स्वागत
देवावरभक्ती असली की कितीही अडचणीचा डोंगर पुढे असला तरी माणूस मागे हटत नाही भक्ती कशी असते याचे उदाहरण म्हणजेच केरळ येथून सौदी अरबिया ला तब्बल 8640 हजार किलोमीटर पार करून चालत जात असलेला हा अवलिया ज्याचे नाव आहे मोहम्मद शहाबुद्दिन छोटूर वय 30
हा अवलिया 8640 किलोमीटर पायी प्रवास करणार आहे त्यामध्ये तो प्रथम भारत पाकिस्तान इराण होय कुवेत व सौदी अरेबिया अशा देशांना भेट देत तो मक्का मदिना ला पोहोचणार आहे
गेल्या सात वर्षापासून हा अवलिया केंद्र सरकार व स्थानिक पातळीवर प्रवास परवानग्यांसाठी प्रयत्न करत होता त्याच अनुषंगाने त्याने असा विचार केला होता की हाज यात्रेला सर्व विमानाने किंवा जहाजाने जातात मात्र मी स्वतः पायी चालत जाऊन हज यात्रा करणार त्यामुळे तो केरळ ते सौदी अरेबिया आठ हजार 540 किलोमीटर पायी प्रवास करत आहे गेल्या पंचवीस दिवसापूर्वी तो केरळ येथून निघाला आहे आज त्याचे रत्नागिरी जिल्ह्यात पदार्पण झाला आहे त्यामुळे सर्व तालुक्यातून त्याचं कौतुक केले जात आहे व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत जेणेकरून त्याच्या या भक्तिमय प्रवासात लोकांचाही हातभार लागावा त्यामुळे जागोजागी त्याचे पुष्पगुच्छ व नारे देत स्वागत केले जात आहे
लांजा मध्ये झालं जंगी स्वागत लांजा जमातुल मुस्लिमीन संघातर्फे लांजा च्या सीमेवर त्याचे स्वागत करण्यात आले त्यानंतर लांजा चा नशा बुखारी दर्गा याठिकाणी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी त्यांनी काही काळ विश्रांती देखील घेतली आहे त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघाले आहेत त्यांच्याबरोबर सात ते आठ लोकांची टीम असून ती टीम त्यांना भारतीय सिमे रेषेपर्यंत पोहोचवणार आहे त्यानंतर ते पुढील प्रवास दुसऱ्या देशातून करणार आहेत त्यासाठी त्यांच्याकडे पासपोर्ट विजा व सर्वसंमत त्यादेखील प्राप्त आहेत असे त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी सांगितले
www.konkantoday.com