आंबा घाटात भीषण अपघात टळला ,खोल दरीत कोसळताना टेम्पो ट्रॅव्हलर कठड्याला अडकल्याने सतरा जण बचावले
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात भीषण अपघात टळला घाटातील गायमुख जवळच्या एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो ट्रॅव्हलर बस दरीत जाता जाता कठड्याला अडकल्याने सुदैवाने अपघात टळला
टेम्पो ट्रॅव्हल्स कर्जत वरून गणपतीपुळे येथे जात होता या गाडीत सतरा प्रवासी होते सुदैवाने हे सर्व जण बचावले आहेत सध्या आंबा घाटात मोठ्या प्रमाणावर धुके पडत असून
घाटात दाट धुके असल्याने हा अपघात घडला असण्याची शक्यता आहे दुर्दैवाने हा टेम्पो दरीत कोसळला असता तर सतरा जणांचा जीव धोक्यात आला असता गेले वर्षभर आंबा घाटात दुरूस्तीचे काम सुरू असले तरी आंबाघाट अजूनही सुरक्षित नाही अनेक ठिकाणी कठडे देखील नाहीत आंबा घाटातील गायमुखजवळ काही महिन्यांपूर्वी एक कार दरीत कोसळली होती त्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे या घाटात सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवणे जरुरीचे आहे
www.konkantoday.com