खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी

खेड : तालुक्यात पावसाची सोमवारी दि. २७ रोजी संततधार सुरू होती. सायंकाळी ४ वाजता जगबुडी नदीने पाच मिटर ही इशारा पातळी ओलांडली आहे. पालिकेने शहरातील नदी किनाऱ्यावरील पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवारी दि. २७ रोजी तालुक्यातील जगबुडी व नारिंगी नद्यांचा जलस्तर सतत वाढत आहे. गेल्या चोवीस तासात तालुक्यात एकूण २९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाळ्यात नदी किनाऱ्याजवळ राहात असलेल्या नागरिकांनी व शहरातील नागरिक तसेच व्यापारी बंधूंनी सतर्क राहिल्यास नुकसान टाळता येईल, असे आवाहन खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button