
गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले.
गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. राजापूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात तीन ठिकाणी वीज पडून सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे. त्यात सातजणांना दुखापती झाल्या आहेत. सुदैवाने, जीवितहानी झालेली नाही. संगमेश्वर, गुहागर, चिपळूण या तालुक्यातही वीज पडण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाचा जोर अजून दोन दिवस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे वीज पडण्याचा धोका अजूनही कायम आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत.परतीच्या पावसाचा जिल्ह्याला ढगांच्या गडगडाटासह कोसळणाऱ्या पावसावेळी वीज कोसळण्याच्या घटना यंदा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे.