
रत्नागिरी शहरातील एकता मार्गावरील रहिवाशाना कमी दाबाने पाणी पुरवठा
रत्नागिरी शहर परिसरात पाऊस सुरु झाला असूनही गेले चार दिवस एकता मार्गावरील रहिवाशाना पाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे अतिशय कमी दाबाने एक दिवस आड पाणी सोडले जातेय त्या दाबाने दीड तासात जेमतेम पाच सहा बादल्या पाणी एक दिवस आड पुरवले जातेय याबद्दल संबंधित विभागाकडे विचारणा केली असता साठवण टाकी भरत नसल्याने पाणी कमी दाबाने येतेय असं सांगितले जातेय जर साठवण टाकीत पाणी पुरेसे भरले नसेलतर संपूर्ण शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा झाला असता संपूर्ण शहराला योग्य दाबाने पाणी पुरवठा होत असताना एकता मार्गावरील रहिवाशी पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत .आता नगरपरिषदेच्यावतीने रोज पाणीपुरवठा केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे मात्र नवी पाणी पाईप पाईप योजना राबविल्यानंतर सर्वांना चांगल्या दाबाने पाणी येईल असे नगरपरिषदेचे म्हणणे असताना या भागात कमी दाबाने पुरवठा का होतंय याचा शोध घेणे गरजेचे आहे
www.konkantoday.com