
कोकण रेल्वेची अप लाइनवरील वाहतूक चालू
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे नागोठाणे ते रोहा मार्गादरम्यान रेल्वे लाईनच्या डाऊन लाईनवर दरड कोसळल्याने आणि मोठ्या प्रामाणावर चिखल साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, अप लाईनवरील वाहतूक सध्या सुरु आहे. डाऊन लाईनवरील दरड हटवून मार्ग सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. लवकरात लवकर ही लाईन वाहतुकीसाठी सुरु करण्यात येईल.
www.konkantoday.com