बेळगावच्या शिवप्पा यांनी लाडका कुत्रा क्रिशच्या वाढदिवसानिमित्त १०० किलो वजनाचा केक कापला आणि सुमारे ५००० पै-पाहुणे जेवू घातले
कर्नाटकात क्रिश नावाच्या कुत्र्याचा वाढदिवस अत्यंत थाटामाटात साजरा झाला. कर्नाटकातील शिवप्पा येलप्पा माराडी यांनी आपल्या पाळीव कुत्र्याचा, क्रिशचा वाढदिवस इतक्या भव्य पद्धतीनं साजरा केला की आजूबाजूचे लोक नुसते पाहतच राहिले. बेळगावच्या शिवप्पा यांनी क्रिशच्या वाढदिवसानिमित्त १०० किलो वजनाचा केक कापला आणि सुमारे ५००० पै-पाहुणे जेवू घातले. या जेवणात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण होते, असं सांगण्यात आलं आहे.अशा या अनोख्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, क्रिशनं जांभळ्या रंगाची टोपी घातलेली आहे आणि शिवप्पा यांनी स्वतः हा 100 किलोचा केक कापून आपल्या प्रिय क्रिशला खाऊ घातला आहे. आजूबाजूला उभे असलेली पाहुणेमंडळी क्रिशसाठी टाळ्या वाजवताना दिसतात. अशारितीनं हा वाढदिवसाचा सोहळा पार पडला. या आधी काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये दोन कुत्र्यांच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या. लग्नाला ४०० हून अधिक पाहुणे उपस्थित होते आणि लग्न पूर्ण रितीरिवाजाने पार पडले. तसेच एप्रिल २०२२ मध्ये तामिळनाडूतील एका कुटुंबाने आपल्या कुत्र्यांचे बेबी शॉवर सुद्धा केले होते.एकूण काय हौसेला मोल नसते हेच खरे
www.konkantoday.com