धाऊलवल्ली येथे मातीचा भराव खचला
राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली आंबेलकरवाडीनजीक गतवर्षी पावसाळ्यात मुख्य रस्त्याच्या बाजूचा एक भाग खचला होता. यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. मात्र संरक्षक भिंत बांधून झाल्यानंतर त्या ठिकाणी मातीचा भराव टाकण्यात आला. हा मातीचा भराव सध्या खचला असून त्या ठिकाणी अपघात होण्याची भीती आहे. ते काम अपूर्ण आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. त्या मार्गावरून एसटी वाहतूक सध्या बंद आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र रस्त्यावरून वाहतूक बंद असल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.