
दापोलीत सोनसाखळी चोराच्या मुसक्या आवळल्या
दापोली : तालुक्यांमधील आसूद गणेशवाडी येथून वृद्धाची चेन चोरणारा भावेश वाळकर या महाडच्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे. चेन लांबविल्याची घटना 20 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली होती. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण महाडिक हे 75 वर्षीय वृद्ध पालगड येथून आसूद येथे आपल्या भाचीकडे जाण्याकरिता दापोली बस स्थानकाजवळ उभे होते. त्यावेळी वाळणकर काळ्या रंगाची पल्सर गाडी घेऊन आला. तोंडाला काळ्या रंगाचा मास्क लावलेला होता. त्याने महाडिक यांना सांगितले की, मी आसुद येथेच जात असून तुम्हाला सोडतो, असे सांगात गाडीवर बसवून आसूदकडे निघाला. त्याने महाडिक यांच्या शर्टच्या कॉलरला झटका देत सुमारे 25 हजार रुपयांची सोन्याची चेन आणि पेंडल हिसकावून त्याने पळ काढला
होता.