
खेडहून आंबवलीकडे जाणार्या मार्गावरील चिखलात फसली वाहने
खेड : पावसाने खेड तालुक्यात हजेरी लावली आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाखालून खेडहून आंबवलीकडे जाणारा कच्चा रस्ता खचला होता. त्यामुळे अनेक गाड्या त्या चिखलात फसल्या होत्या. तर महामार्गावरील भरणे नाक्यावर पावसामुळे चिखलातून वाहने चालवणे अवघड बनले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी महामार्ग कंपनीच्या ठेकेदाराच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डेही पडले असून तेथे पाणी साचत आहे.